नांदेड ( जि.प्र.)
हिंदू धर्मात सर्वात मोठा दिवाळी सण असून अपुऱ्या विजेअभावी बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांसह अनेकांना त्रास होत आहे.दिवाळी सणा दरम्यान वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी भाजपाचे महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अधिक्षक अभियंता यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा खुलून गेल्या असून खरेदीसाठी जेष्ठ नागरिक, महिला,मुली,बालके यांची गर्दी झाली आहे.बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.परंतु वीज पुरवठा खंडित होत आहे.त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या महिलांसह मुलींना त्रास होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे सक्रिय होण्याची शक्यता असून मंगळसूत्र , गंठण लंपास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दिवाळी सणा दरम्यान वीज पुरवठा अखंडित ठेवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी सरचिटणीस दिलीपसिंग सोडी, शीतल खांडिल, राज यादव,राजकुमार पर्रे, अन्वर सादात, सतीश बेरूळकर नवनाथ कांबळे, रिषी मेड, अंबादास जोशी,

By sd2022