नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या (BJP) भाजपा पक्ष प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपने जल्लोष केला. मात्र अशोक चव्हाण यांच्या (Nanded) समर्थकांनी कुठेही जल्लोष केला नसल्याचे दिसून आले. (Maharashtra News)
काँग्रेसचे (Congress) नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यानंतर नांदेडमध्ये भाजपने जल्लोष साजरा केला. मात्र अद्याप अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांच्या समर्थकांनी कुठेही जल्लोष केला नाही. सध्या जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्तेमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. दरम्यान नांदेड शहरातील महावीर चौक परिसरात भाजपाने हा जल्लोष साजरा केला.
नांदेड हा काँग्रेस पक्षाचा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र कुठलाही जल्लोष केला नाही. अशोक चव्हाण हे भाजपा मध्ये आल्याने भाजपच्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चव्हाण यांच्या भाजप पक्ष प्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये स्वागत आहे; अशी प्रतिक्रिया भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.