*प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर स्वागत*

नांदेडवरून चेन्नईला रवाना

नांदेड दि. ४ : श्री. गुरु गोविंदसिंघजी नांदेड विमानतळावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास आदीलाबादवरून आगमन झाले. विमानतळावर मान्यवरांनी स्वागत केल्यानंतर लगेच त्यांनी विशेष विमानाने चेन्नईकडे प्रयाण केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तेलंगणातील आदीलाबाद येथील एका सार्वजनिक सभेसाठी आज सकाळी नागपूर येथून हेलिकॉप्टरने उपस्थित झाले होते. त्याच हेलिकॉप्टरने ते नांदेड विमानतळावर आले. नांदेडवरून विशेष विमानाने ते चेन्नईकडे रवाना झाले त्या वेळी

विमानतळावर नांदेड चे श्री खासदार प्रताप पाटील चिखलीकर जी , हिंगोली खासदार श्री हेमंत पाटील जी, राज्येसभा खासदार श्री ड्रा अजित जी,राज्येसभा खासदार श्री अशोक चोव्हाण जी, आमदार श्री राम पाटील रातोलीकर, भारतीय जनता पार्टी चे महामंत्री संजय जी कुडगे, जिल्हाध्यक्ष श्री संतुक हंबर्डे जी ,  महानगर अध्यक्ष श्री दिलीप कंदकुर्ते जी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

By sd2022