दिनांक : 13.02.2023
दिनांक 03 फेब्रुवारी, 2023 रोजी शिवणी येथील यात्रेमध्ये झळकवाडी येथील मुलांचा वाद झाला होता. मौ. शिवणी येथील गावकऱ्यांनी 1) विशाल मेडेवार, 2) सुर्यकांत कारलेवाड, 3) आदर्श बादरवाड, 4) मनीकंठ कोंडलवाड, 5) लक्ष्मण कोरलेवाड, 6) सुरेश कोरलेवाड यांनी यात्रेमध्ये वाद निर्माण केला. झळकवाडी येथील तक्रारदार 1) चांपती बाबुराव झाडे 2) मंगेश रामकिशन वागतकर 3) सचिन दिगांबर डुकरे 4) तुकाराम हौसाजी झळके यां सार्वाना पोलीस स्टेशन इस्लापुर येथे आणले गावकऱ्यांनी सांगीतले की. केसेस झाल्यावर मुलांचे जिवन उध्वस्त होईल समज देवुन वाद मिटवुन अपसात समेट घडुन आणावा असे सांगीतल्यावरून सर्वाना समज द्या व पुन्हा भांडण होणार नाही असी समज द्या असे सांगीतले. सदरचा प्रकार अंतर्गत वादावरून घडला होता.
सदर प्रकरणांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार श्री मारोती थोरात यांचेकडे प्राथमीक चौकशी दिल्याने सर्व मुलांचे जबाब घेण चालु आहे. कांही मुले बाहेर गावी गेलेले आहेत. चौकशी मध्ये कांही आढळल्यास संबधीतावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
सपोनि श्री रघुनाथ शेवाळे, दोन्ही बाजुची तक्रार घेवुन गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. तसेच त्यांनी न करता गावकऱ्यांच्या दबावाला बळी पडुन त्यांनी आपसात मिटवा मिटवी करण्याचा प्रयत्न केला. म्हणुन त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना मारहाण करीत असले बाबतचा एक व्हिडीओ समाज माध्यमाद्वारे प्रसारीत झालेला आहे. त्यामध्ये गोरक्षणाच्या प्रकरणातुन मारहाण केलेली आहे असे समाज माध्यमातुन प्रसारीत करण्यात येत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. सदर प्रकरण हे गावांतील आपसातील वाद, व भांडण झाल्यामुळे घडले असुन त्यात गोरक्षक, इतर कोणत्याही संघटनेशी संबध नाही.
உ जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड

By sd2022