रामोजी पब्लिक स्कूल कौठा येथे ऊमंग वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात..
नविन नांदेड. कौठा येथील रामोजी पब्लिक स्कूल शाळेत ऊमंग वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आले असून या वेळी कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल डॉक्टर, महसूल, पोलीस,साफ सफाई , परिचारिका यांच्या सन्मान चिन्ह, व शाल ,वृक्षरोप देऊन सत्कार करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रामोजी पब्लिक स्कूल कौठा येथे ५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते यावेळी माजी नगरसेवक राजू गोरे,नायब तहसीलदार मुगाजी काकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, डॉ.महेश काबरा,सौ.शेळके,शिक्षीका कविता महाजन,सौ.वर्षा पंडित यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत होती .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ.शिवाजी गोरे यांनी केले,या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती,गोंधळ ,पोवाडा,हिंदी मराठी गित यासह एकांकी,कोरोनावर आधारीत कलाकृती सादरीकरण करण्यात आले तर कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुत्रसंचलन सिध्दार्थ कांबळे,तर आभार स्वाती बरीदे यांनी केले तर यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक सारिका कवटगी,दिपीका यादव, गणेश कुंटूरकर,सोनाली मुळे,सरिता वंजारे,मिरा गिते,लक्षमी बैस,निकीता मुंदडा,रोहीनी लडडा,सुजाता मनकल रेखा कापसे, किनंगावकर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी उपस्थित पालक व रसिक श्रोते यानी सादरीकरण केलेल्या गितावर, नृत्य यावर टाळायचा प्रतिसाद देत प्रोत्साहन दिले.