रेल्वेच्या सुविधांबाबत फुकटचे श्रेय कूणीही लाटू नये : भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांचा विरोधकांना सल्ला
नांदेड : देवगिरी एक्सप्रेस चे जुने डबे बदलूनी नवे डब्बे बदलण्याचा आदेश, निर्णय केंद्र सरकारचा असल्यामुळे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा सातत्याने पाठपुरावा राहिला आहे. मात्र काहीजण फुकटचे श्रेय लढण्याचा प्रयत्न चालवत आहेत. सत्तेत आणि पदावर असताना कोणत्याही प्रकारची रेल्वे उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या या नेतृत्वाने आता मात्र श्रेय लाटण्याचा केविलवाना प्रयत्न चाललेला आहे. असा घनाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे शहर महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात तरी असा केविलवाणा प्रकार करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
मुंबई – सिकंदराबाद- मुंबई या देवगिरी एक्सप्रेस चा जुन्या डब्यांना बदलून त्यांच्या ठिकाणी नवीन डबे बसवाव्यात यासाठी केंद्र सरकारने नुकतीच आदेशित केले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी अनुषंगाने घोषणा केली आहे. केवळ केंद्र सरकारच्या जीआर वर लक्ष ठेवून त्यांच्या निर्णयावर लक्ष ठेवून आपणच हे काम करावयास लावले अथवा करून घेतले असे सांगून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न काही जणांकडून सुरू आहे. ही अत्यंत केविलवाणी बाब आहे . कोणत्याही प्रकारच्या लोकहिताच्या कार्यक्रमात स्वतःला दूर ठेवणाऱ्या नेत्यांनी गेल्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये रेल्वे विकासासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत हे जग जाहीर आहे. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामुळे राज्य राणी एक्सप्रेस नांदेड पर्यंत येऊ शकली तर मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी चांगल्या सुद्धा मिळण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यामुळे नांदेडहून आणि मराठवाड्यातील विविध भागातून धावणाऱ्या रेल्वेची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे केंद्रीय मंत्रिमंडळातील असलेले वजन आणि रेल्वेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कामकाजाचा सपाटा विरोधकांना पाहवत नाही हे यातून दिसून येते . विरोधकांचा श्रेय लाटण्याचा प्रकार हा जुनाच असून जनतेला या लोकांचे मनसुबे चांगलेच ठाऊक असल्याचेही प्रवीण साले यांनी सांगितले. दरम्यान विरोधकांनी अधिक कामे करावेत मग श्रेय लाटावे, केवळ लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला आहे.