नांदेड प्रतिनिधी
नांदेड:- भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय खासदार मा प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा अब्दुल रहिम पटेल डौरकर यांनी आज दि 05 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक आयोजित केली होती या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील संपुर्ण तालुक्यातील अल्पसंख्याक मोर्चाचे तालुकाध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी व नांदेड शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते.
या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन व चर्चा झाली आणि मा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपस्थित अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व पदाधिकार्यांनां मार्गदर्शन करताना म्हणाले की तुम्हाला खूप चाणाक्ष मेहनती अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम पटेल हे लाभले आहेत ते सतत कार्यरत असतात व तुमच्या समोर खुप मोठे आव्हान आहे की अल्पसंख्याक चे मत परिवर्तन घडवून आणायची यासाठी तुम्ही सर्व जिद्दीने काम करा मी तुमच्या सैदव सोबत आहे असेही ते म्हणाले.यानंतर उपस्थित अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्त्यांनी आपापले मत मांडले जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम पटेल यांनी सर्वांना सोबत घेऊन शासकीय कमीटी मध्ये चांगल्या पदावर नियुक्ती करुन सर्वांना सोबत घेऊन मी समस्त जिल्हा पिजुंन काढीन आणि येणाऱ्या काळात अल्पसंख्याकाचे 100%मतदान कसे करता येईल याकडे विशेष लक्ष दिले जाईल असे ते म्हणाले.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा नांदेड महानगर चे महामंत्री व्यंकटराव मोकले सरांनी अध्यक्ष समारोप करताना रहिम पटेल व त्यांच्या सर्व टिमचे मनःपूर्वक आभार मानले आणि सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख आरीफ निमटेककर यांनी केले तर आभार प्रदर्शन तोसीफ अहेमद हे केले यावेळी कार्यक्रमाला सर्वांचे लाडके लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व महानगर चे महामंत्री व्यंकटराव मोकले, विद्या वाघमारे,अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रहिम पटेल डौरकर, अवतार सिंग जी, प्रसिद्धी प्रमुख तौसीफ अहेमद,मिर्झा सोहेल बेग,सय्यद मेहताब खैरगावकर,शेख जमीर अहमद देगलूरकर,अब्दुल सत्तार ( नजीर) अजीम भाई अन्सारी, नुरोदिन अब्दुल गणी चिखलीकर, रईसखान पठाण उमरीकर, शेख अफरोज मेहबूब साहब ,मोहम्मद अमजत मोहम्मद उस्मान ,शेख जावेद भाई लहानकर,शेख शादुल खादरसाब, गौस शादुलसाब, शेख खाजा साहब देगलूरकर, मोहम्मद अफजल सर कुंडलवाडीकर,शेख मोहसीन उमरीकर, मुस्तफा पठाण, रेहान पठाण, मोहम्मद जैद, शेख फिरदोस मेहबूब साहब, मोहम्मद सज्जाद नांदेडकर,अतीख घांची, मोहम्मद झहीर,मिर्झा शाहिद बेग, शेख इमरान,इत्यादी पदाधीकारी उपस्थित होते.

By sd2022