श्री क्षत्रिय समाज, गाडीपूरा, नांदेड आयोजित #फागुन फागमेळा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री राधाकृष्ण मंदिर, यादव अहिर मंडळ हनुमान पेठेत संपूर्ण समाजासह पोहोचले
येताच यादव गवळी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक बाळाराम बटावले, गणेशलाल मंडले, भरत चौधरी, फुलचंद यादव, गगन यादव, गोपाल फत्तेहलष्करी, मनोज मंडले, डॉ.कैलास भानुदास यादव, गोकुळ मंडले,आदींनी शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देवून मंडळीचे स्वागत केले.
गगन यादव यांनी स्वागतपर दोन शब्द बोलताना यादव व क्षत्रिय समाजाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला या प्रसंगी परिसरातील
राजेश कुलकर्णी, तुळजेश चौधरी, शुभम यादव, राज यादव, सुदेश ठाकुर, राजेश ठाकुर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.