भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री अब्दुल रहीम पटेल व जिल्हा उपाध्यक्ष श्री मिर्झा सोहेल बेग व सोशल मीडिया प्रमुख श्री तौसिफ अहेमद,रईस पठाण,आरीफ नीमटेककर.शेख जावेद लहानकर,मिर्झा गफारबेग,रईस अली, शेख नजीर भाई, शेख इमरान, शेख जहीर, शेख नोमन पटेल,मिर्झा साहील बेग,श्री गजू भाई, इत्यादी शिष्टमंडळ माननीय जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन दिनांक १४/०३/२०२३ रोजी झालेल्या शालांत प्रमाणपत्र दहावी बोर्ड परीक्षेत उर्दुं माध्यमाची भूमिती (गणित 2) या विषयाच्या प्रश्पत्रिकेत भाषांतर चुकीमुळे विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रास व त्याचा गेलेला वेळ याचा विचार करून संबंधित प्रश्नाचे सर्व गुण देण्यात संदर्भात लातूर विभागीय शिक्षण मंडळामार्फत सर्व भूमितीच्या परीक्षक तसेच निरीक्षकांना सूचना/आदेश देऊन लातूर बोर्डाचा निकाल अपेक्षाप्रमाणे निघतील याकडे लक्ष देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी व एस.एस.सी.लातूर बोर्डाचे सचिव,यांना विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. सर्व परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यासोबत भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा पाठीशी खंबीरपणे उभे आहे त्यांना काय चिंता करायची गरज नाही असे नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री अब्दुल रहीम पटेल यांनी असे प्रतिपादन केले आहे.

By sd2022