नांदेड – प्रतिनिधी
नांदेड:-जिल्ह्यातील नांदेड, उमरी, नर्सी ,नायगाव, देगलूर, मुदखेड, लोहा, हदगांव या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सुरूच आहे प्रशासना कडून कसल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे सर्वत्र जुनी पेन्शन साठी महसूल विभागाचे अधिकारी संपावर गेले की काय अशी चर्चा सुज्ञ नागरिकाकडून ऐकण्यास मिळत आहे. वाळूचे उत्खनन व तिच्या वाहतुकीवर बंदी असतानाही नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात त्याची खुली वाहतूक सुरूच आहे.तसेच वारंवार दैनिक व साप्ताहिक ह्या वृतपत्रा मध्ये वाळू तस्करी ची वारंवार बातम्या प्रसारण होत आहे.
तरी तालुक्यातील महसूल विभागाला जाग येत नाही..
नांदेड हा सर्व तालुक्यांचा माहेर घर आहे व सर्व अधिकारी चे अधिकारी जिल्हा अधिकारी साहेब नांदेड येथे विराजमान असतात. यासाठी शिव-छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संगीता ताई विभुते व जिल्हा कार्याध्यक्ष विद्याताई वाघमारे यांनी वाळू तस्करी करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कार्यवाही न केल्यास येणाऱ्या 05/04/2023 या रोजी उपोषण करणार असल्याचे निवेदनाद्वारे माहिती दिली आहे.