नांदेड़ : नांदेड़ पुलिस  जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.श्रीकृष्णजी कोकाटे यांच्यासोबत महत्वाच्या विषयावर आज बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत आगामी कालावधीत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासोबतच रमजान ईद व अन्य सर्वधर्मीय सणोत्सव पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारपेठा, दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात यावेत नागरिकांना खरेदीसाठी अधिकचा वेळ उपलब्ध करून देण्यात यावा यासह छोटे मोठे व्यापारी बांधव व अन्य महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात साहेबांशी चर्चा करून सकारात्मक मागण्या करण्यात आल्या. याप्रसंगी माजी महापौर प्रतिनिधी विजय येवनकर, माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, माजी उपमहापौर शमिम अब्दुल्लाह, माजी उपमहापौर मसूद खान यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

By sd2022