*काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासमोर हात*
भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांची चर्चा काँग्रेस पक्षाच्या बैठकीत शीर्षस्थानी होती . आणि ही चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खुद्द जिल्हा नेतृत्व असलेले *माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण* यांच्यासमोर केली त्यामुळे अशोक चव्हाण यांना निमुटपणे भाजप पक्षाच्या एका सामान्य कार्यकर्त्याची वाह-वाह ऐकावी लागली .
निमित्त होते औराद येथील प्रचारा संदर्भात जात असताना अशोक चव्हाण यांनी देगलूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची खाजगीत बैठक बोलावली यात या बैठकीदरम्यान कोणत्याही *चित्रीकरणास व फोटोसेशन* (ही चर्चा बाहेर जाईल या भीती पोटी) करण्यास सक्त मनाई होती. या झालेल्या बैठकीत अशोक चव्हाण यांनी देगलूर तथा बिलोली मतदारसंघातील विविध समस्या आणि गाऱ्हानी ऐकण्यासाठीही सभा बोलावली होती. परंतु या सभेत काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नावाची स्तुती सुमने उधळली कारण या भागातील प्रत्येक समस्या ,जयंती उत्सव ,मंदिराचे प्रश्न, मस्जीदीचे प्रश्न , विहार व इतर समाजातील मोठे-छोटे प्रश्न घेऊन येथील जनता थेट व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे घर जवळ करीत आहेत..
व्यंकटराव पाटील हे भाजप पक्षाचे कार्यकर्ते जरी असले तरीही ते सर्व पक्षातील नागरिकांना एक माणूस म्हणून जवळ घेऊन त्यांची समस्या तात्काळ सोडवण्यात कार्यतत्पर आहेत. त्यामुळे याची या भागातील जनतेच्या सगळ्या समस्या एकंदरीत मार्गी लागत असून त्यासाठी कोणत्याच प्रकारची अडचण निर्माण होत नाही, अनेकदा व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी सढळ हाताने आर्थिक मदत सुद्धा केलेली दिसून येते. एवढेच काय सामान्यातला सामान्य देवाचा सेवेकरी असणाऱ्या माणसाला उदाहरणार्थ मष्णेर इत्यादी ग्रामदैवतासाठी निर्माण झालेले प्रश्न घेऊन गेल्यास त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना पाठविण्यात येते …शिवाय या ठिकाणी कधी कोणीच रिकाम्या हाताने परत गेलेले दिसून येत नसल्याचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगितले .याशिवाय या भागातील 80 टक्के सोसायटी भाजप पक्षांनी काबीज केलेली दिसून येते त्यामुळे कदाचित अशोक चव्हाण यांना व या भागातील आमदारांना सुद्धा शरम वाटावी असे चित्र त्या बैठकीत निर्माण झाले होते… एकूणच काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आता लवकरच *सुरुंग* लागण्याची चिन्हे दिसून येत आहे आणि हा सुरुंग पेटविण्यासाठी व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे सज्ज आहेत, त्यामुळे या भागाचा भागात येणाऱ्या काळामध्ये भाजपचा झेंडा लवकरच फडकेल असे आता काँग्रेसच्या जिल्हा नेतृत्वाला सुद्धा व वाटायला लागल्याचे चित्र त्यांच्या चेहर्या वर दिसत आहे…
✍🏻 *अशोक कांबळे देगलूरकर* ✍🏻