नांदेड : दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध तिर्थक्षेत्र पिठापुरम येथे श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचे जन्मस्थळ असून मराठवाड्यातील असंख्य भाविक नित्य नेमाने पिठापुराम येथे जात असतात पण मराठवाड्यातील भाविकांना पिठापुराम येथे जाण्यासाठी राजमुंद्री रेल्वे स्टेशन वर उतरून पिठापुराम येथे जावे लागते.भाविकांची गैरसोय लक्षात घेता आज नांदेड मध्ये रेल्वे राज्य मंत्री मा.रावसाहेब दानवे पाटील आले असता नांदेड येथून विशाखापट्टणम कडे जाणार्या गाड्यांना तिर्थक्षेत्र पिठापुरम येथे थांबा देण्याच्या मागणीचे निवेदन खा.प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी दिले यावेळी या मागणीस सकारात्मकता मा.महोदयांनी दर्शवली आहे यावेळी प्रणिता देवरे चिखलीकर,मिलिंद देशमुख,व्यंकट मोकले,व्यंकटेश साठे, राज यादव,अंकुश पार्डीकर उपस्थित होते.