पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारची तत्वतः मंजुरी
शेतकऱ्यांच्या शेती पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार
पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधाऱ्यांसाठी सातत्याने सुरू असलेल्या माझ्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे.
याकामी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांचासुद्धा सतत पाठपुरावा सुरु होता. या बंधाऱ्यांमुळे हदगावसह, हिमायतनगर, किनवट, माहूर आणि पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. पैनगंगा नदी ही हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याची जीवनवाहिनी आहे. नदीवरील इसापूर धरणाने शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची गरज भागविली आहे.
पैनगंगा नदीवर इसापूर धरणाची निर्मिती झाली तेव्हा धरण व परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचे समसमांतर वाटप व्हावे, यासाठी कालवे तयार करण्यात आले. परंतु निर्मिती केलेल्या कालव्यांपैकी अनेक कालवे आज नादुरुस्त असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळत नव्हते. धरण परिसरातीलच शेतकरी अनेक वर्षांपासून पाण्यापासून उपेक्षित राहत होते. त्यामुळे पैनगंगा कयाधू खोऱ्यातील सिंचनाची तुट भरुन काढणार असल्याची ग्वाही यापूर्वीच मी दिली होती. शासनाने २०१६ साली पाणीपट्टीतून जमा झालेल्या पैशातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कामे करता यावी, यासाठी जीआर काढला होता. त्या अनुषंगाने १५ नोव्हेंबरला माझ्या उपस्थितीत पोफाळीच्या वसंत साखर कारखाना येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यावेळी पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधाऱ्याची आवश्यकता असल्याचे सर्वांच्या लक्षात अणून दिले होते. पैनगंगा नदीवरील सात उच्चपातळी बंधारे पूर्णत्वास आल्यास अजूबाजूची १० हजार ६०० हेक्टर जमीन ओलीताखाली येईल आणि त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावेल असा विश्वास व्यक्त केला होता. यामुळे आता पैनगंगा नदीपात्रातील शेतकऱ्यांना पाण्याचे समसमान वाटप होईल आणि एकही शेतकरी आता पाण्यापासून वंचित राहणार नाही.यासोबतच बेल मंडळ आणि कुर्तडी येथे वितरीकेचा (कॅनॉल) सर्व्हे करण्याच्या कामासही मंजुरी देण्यात आली आहे यामुळे लवकरच याचा लाभ मिळणार आहे.
#CMOMaharashtra #EknathShindeSaheb #DevendraFadnavis #hingoliloksabha #Painganga #baburaokadam #isapurdam

By sd2022