नांदेड : नायगाव तालुक्यातील पुनर्वसीत सांगवी या गावातील विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयात सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती . या बैठकीत सर्व विभागाचा आढावा त्यांनी घेतला. संबंधितांना तातडीने सांगवी येथे सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
नायगाव तालुक्यातील सांगवी या गावाचे गोदावरी नदीला येणाऱ्या पुरामुळे पुनर्वसन करण्यात आले होते. यामुळे 1983 मध्ये झालेल्या पुनर्वसनाचा फायदा आजही येथील नागरिकांना मिळालेला नाही.तब्बल ५५ कुटुंब येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक सहन कराव्या लागतात. मूलभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागतो. वीज, पाणी, नाली , सांडपाणी व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, रस्ते या मूलभूत सुविधा येथे पुरविण्यात आल्या नाहीत .अनेक वेळा अर्ज , निवेदन देऊन झाल्यानंतरही शासनाने येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषण स्थळी जाऊन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना गावात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आश्वासित केले होते. शिवाय दिनांक 14 जुलै रोजी एक व्यापक आणि सर्व विभागाची बैठक बोलावण्याचाही शब्द दिला होता . या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिनांक 14 जुलै रोजी आपल्या साई सुभाष या संपर्क कार्यालयात सर्व विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सांगवी येथील मूलभूत सुविधा पुरविण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजनांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली. गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा. चिखलीकर यांनी आपल्या निधीतून तातडीने मोटार मंजूर करण्याचे निर्देश दिले. शिवाय अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता गावात सर्व सोयी सुद्धा उपलब्ध करून द्याव्यात असेही आदेश दिले. या बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती देवकुळे, नायगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, तहसीलदार भगत , महावितरणचे अधीक्षक अभियंता जाधव, पाणीपुरवठ्याचे अभियंता नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कोटलवार, गटविकास अधिकारी वाजे , सीडीपीओ राजुरे, ग्रामसेवक रोडेवार यांच्यासह सांगवी गावातील सौ रंजनाताई वेंकटराव कदम, कौशल्याबाई सुरेश जाधव, चंद्रकलाबाई तुळशीराम पांचाळ, नागनाथ रावजी ,अविनाशराव अडुलवार ,माधव पांडे, पिंटू सांगवीकर, अनिल अलुरवार आदींची उपस्थिती होती . दिनांक 14 जुलै रोजी बैठक घेण्याचा खा. चिखलीकर यांनी दिलेला शब्द पाळला असून ग्रामस्थांनी याबद्दल खा. चिखलीकर यांचे आभार मानले आहेत.
सांगवी येथील समस्या सोडविण्यासाठी खा. चिखलीकर यांनी घेतला विविध विभागाचा आढावा : १४ जुलै रोजी बैठक घेण्याचा पाळला शब्द
नांदेड : नायगाव तालुक्यातील पुनर्वसीत सांगवी या गावातील विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपल्या संपर्क… pic.twitter.com/Efjyk4JNAo— Prataprao Patil Chikhalikar (Modi Ka Parivar) (@MPPratapPatil) July 14, 2023