*आज दि. 20 जुलै रोजी शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा 11:30 pm वाजता उघडण्यात येत असल्यामुळे, सदर प्रकल्पाच्या खालील बाजूस असलेल्या बळेगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. म्हणून बळेगाव बंधाऱ्याचा एक दरवाजा आज 11:30 PM वाजता उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.*
तरी गोदावरी नदीकाठावर असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेची, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, व इतर कोणतीही हानी होणार नाही, यासाठी संबंधितांनी दक्षता घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.